Kangana Ranaut Slapped and Humiliated | कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर CISF सुरक्षा कर्मचाऱ्यांनी थप्पड मारली

 

बॉलिवूड अभेनेत्री कंगना रणौत नेहमीच चर्चेत असते पण ह्या वेळेस ती एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत हिला चंदीगड विमानतळावर केंद्रीय आद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF ) कॉन्स्टेबलने थोबाडीत मारल्याचा आरोप होत आहे .(Kangana Ranaut Slapped). कुलविंदर कौर असे आरोप होत असलेल्या महिला कॉन्स्टेबलचं नाव आहे . तिला निलंबित करण्यात आले असून , तिच्या विरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर ) दाखल करण्यात आला आहे .रानौतला थोबाडीत मारल्यानंतर , हवालदाराने अभिनेत्री व खासदार कंगना रणौत हयानी कथितपणे
“शेतकऱ्यांचा अनादर ” केल्याने आपण थोबाडीत मारल्याचे सांगितले . हा सर्व प्रकार दुपारी ३:३० वाजता झाला आहे जेव्हा कंगना दिल्लीला जाणाऱ्या विमानात बसण्यासाठी बोर्डिंग करत होती .

Kangana Ranaut

कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर CISF सुरक्षा कर्मचाऱ्यांनी थप्पड मारली Kangana Ranaut Slapped

दिल्लीला गेल्यानंतर कंगणाने सीआयएसएफच्या महासंचालक नीना सिंह यांची भेट घेऊन सगळ्या घटनेबद्दल माहिती दिली . कंगना यांनी आरोप केला की सीआयएसएफच्या कॉन्स्टेबलने आपल्याला थोबाडीत मारली आणि गैरवर्तन केले. ह्या प्रकरणी कॉन्स्टेबल कुलविंदर ह्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे . ह्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चंदीगड एअरपोर्टच सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासण्यात येणार आहे .(Kangana Ranaut Slapped)

घटनेच्या काही वेळाने , कंगना ह्यांनी या घटनेची पुष्टी करणारा एक व्हिडिओ जारी केला . या व्हिडिओत कंगनाने सांगितले की ” मी सुरक्षित आहे मी पूर्णपणे ठीक आहे चंदीगड एअरपोर्टवर घडलेली घटना ही सुरक्षा तपासणी पूर्ण करत असताना घडली आहे . सुरक्षा तपासणी झाल्यानंतर एक महिला अधिकारी माझ्या दिशेने आली व मला मारहाण केली त्यावेळेस मी तिला असे का करत आहे याचा जाब विचारला असता तेव्हा त्या कॉन्स्टेबलने सांगितले की ती शेतकऱ्यांचं समर्थन करते . पण मला चिंता ह्याची आहे की पंजाब मध्ये वाढणारा हा हिंसाचार आणि दहशत आपण कशी नियंत्रित करणार आहोत .(Kangana Ranaut Slapped)

 

कंगनाने अलीकडेच मंडी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे

नुकतीच कंगणाने रणौत , मंडी लोकसभा मतदारसंघातून तब्बल ७४,७५५ मतांनी विजय मिळवला आहे . त्यांना एकूण ५,३७,०२२ मत मिळाली आहेत .

 

 

 

 

1 thought on “Kangana Ranaut Slapped and Humiliated | कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर CISF सुरक्षा कर्मचाऱ्यांनी थप्पड मारली”

Leave a Comment