NEET 2024 | नीट 2024 बाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय !
नवी दिल्ली: मंगळवारी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार व NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीला एक नोटीस बजावली आहे . पदवी पूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी एक अती स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा म्हणून नीट (NEET 2024 ) कडे बघितले जाते पण याच परीक्षेचा एक पेपर लीक झाल्याचा आरोप होत आहे. NEET २०२४ चा निकाल रद्द करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ही नोटीस बजावली आहे.”तुम्ही ती परीक्षा घेतली म्हणजे ती पवित्र आहे असे नाही. परीक्षेच्या पावित्र्यावर परिणाम झाला आहे त्यामुळे आम्हाला उत्तरे हवी आहेत असे सुप्रीम कोर्टाने एन टी ए ला सांगितले .
प्रवेशासाठी होणारे समुपदेशन सुरूच राहील …..
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की प्रवेशासाठी होणारे समुपदेशन सुरूच राहील न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि अहसनुद्दिन अमानुल्ला म्हणाले ” समुपदेशनची प्रक्रिया आम्ही थांबवत नाही आहोत ही प्रक्रिया सुरूच राहील ” .
त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्यासमोर दाखल केलेल्या याचिकेवर केली जाईल पुढील सुनावणी आठ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे .
कोर्ट NEET 2024 च्या निकालांवर चालू असलेल्या एका नव्या याचिकेवर सुनावणी करत होते . ह्या याचिकेमध्ये पाच मेला झालेल्या परीक्षेतील गुण रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे नव्याने परीक्षा घेण्याची मागणी ही याचिकेत करण्यात आली आहे .
तेलंगणा व आंध्र प्रदेशातील ग्रेस गुणांच्या अनुदानात तफावत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे .
NEET 2024
याचिकाकर्त्यांनी आंध्र प्रदेश व तेलंगणामध्ये दिलेल्या ग्रेस मार्क्स मध्ये कुठल्याही प्रकारचे ठोस कारण नाही व सांख्यिकदृष्ट्या अशक्य असणाऱ्या 720 पैकी 720 मार्क पडणारे विद्यार्थी यांच्याकडे लक्ष वेधले आहे . दिलेल्या ग्रेसमार्क्स साठी केवळ वेळेचा अपव्य हेच कारण देण्यात आले आहे असे याचिकाकर्त्यांनी दावा केला आहे.एका विशिष्ट कोचिंग सेंटर मधील 67 विद्यार्थ्यांना पूर्ण 720 पैकी 720 गुण मिळाले आहेत या वस्तू स्थितीकडे देखील याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधले आहे
“या क्षेत्रात वैज्ञानिक आणि वैद्यकीय ज्ञानाची सखोल माहिती असणे आवश्यक आहे .. फसवणूक करणे किंवा परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी अयोग्य मार्गाचा वापर करणे यामुळे रुग्णांचे जीवन धोक्यात येऊ शकते “असे याचिकाकर्त्यांनी याचिकेत म्हटले आहे .
सर न्यायाधीशांचे नेतृत्वाखालील खंडपीठाने अशीच एका याचिकेवर सुनावणी करत असताना नोटीस जारी केली आहे परंतु निकाल जाहीर करणे थांबवले नाही .
दरम्यान एनटीए ने निर्णय घेतला आहे की एक उच्चस्तरीय समिती 1600 विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण व विश्लेषण करेल ज्यांनी आधीच नीट 2024 परीक्षा दिलेली आहे.
हे पण वाचा
Monsoon in Maharashtra | आनंददायी बातमी! मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. | Good news
आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/CWhW3RK9zKuHkBhBqvo1CR
1 thought on “NEET 2024 | नीट 2024 बाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय !”