Monsoon in Maharashtra | आनंददायी बातमी! मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. | Good news

उन्हाळा संपताच आपल्या शेतकरी बांधवांना आशा लागते ती पाऊसाची . शेतकऱ्याच्या आयुष्यात पाण्याचं महत्त्व अमूल्य आहे . हंगामी पेरणीसाठी पाण्याची गरज खूप लागते . पाऊस झाला नाही तर उपलब्ध असलेल्या पाण्यात शेतकऱ्यांना शेती करावी लागते .जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात पाऊसाची अपेक्षा असते .

मान्सून महाराष्ट्रात दाखल (monsoon in maharashtra)monsoon

गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना पाऊसाची अपेक्षा आहे . पण आता मान्सूनबाबत चांगली बातमी येत आहे . नैऋत्य मान्सून बाबत ६ जूनला हवामान खात्याने माहिती दिली आहे . महाराष्ट्राच्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ , वेंगुर्ला तालुक्यात पाऊसाची सुरुवात झाली आहे . तळ कोकण हे महाराष्ट्रात मान्सूनचे (monsoon) प्रवेशद्वार मानले जाते .

हवामान खात्याने सांगितले की नैऋत्य पाऊस ६ जूनला महाराष्ट्रात दाखल झाला आहे .

नक्की काय म्हंटले हवामान विभागाने


हवामान विभागच्या माहिती नुसार , मान्सून (monsoon) कोकणातील सिंधुदुर्ग , रत्नागिरी नंतर सोलापूर मार्गे तेलंगणातील मेडक , आंध्रप्रदेशातील भद्रचलम नंतर बंगालच्या खाडीत प्रवेश करेल . ही माहिती इंडियन मेट्रोलोजिकल डिपार्टमेंट चे हेड के .एस . होसालिकर यांनी (X ) द्वारे दिली .

मान्सून मुंबईत कधी दाखल होणार

मान्सून मुंबईत ७ ते ८ जून दाखल होईल आणि त्या नंतर १० जून पर्यंत राज्यात पसरेल असाही अंदाज आहे . कोकणात आजुन पर्यंत तरी पाऊस सुरू झालेला नाही , मात्र लवकरच मुसळधार पाऊसाची सुरुवात होईल असाही अंदाज आहे .

शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत

सामान्य जनते बरोबरच शेतकऱ्यांनाही पाऊसाची प्रतीक्षा आहे. ह्या वेळेस महाराष्ट्रात उन्हाळा जोरदार होता . तापमान सुद्धा कमालीचं उच्च होत . मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात ४० ते ४५ डिग्री पर्यंत उच्चांक गेला होता .

रत्नागिरी मधे पाऊस

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी दिनांक ५ जून रोजी अनेक ठिकाणी पाऊस झाला . उष्णतेने त्रस्त जनतेला ह्या मुळे थोडा दिलासा मिळाला . कुडाळ आणि कणकवली मध्ये थोडा पाऊस झाला . रत्नागिरी जिल्ह्यात दापोली ,खेडसहित चिपळूण मधे पाऊस झाला .

 

हे पण वाचा

Kangana Ranaut Slapped and Humiliated | कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर CISF सुरक्षा कर्मचाऱ्यांनी थप्पड मारली

 

1 thought on “Monsoon in Maharashtra | आनंददायी बातमी! मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. | Good news”

Leave a Comment