TOP 5 must watch malayalam movies | हे 5 मल्याळम (malayalam movies) चित्रपट प्रत्येकाने पहावेत
नमस्कार मित्रांनो , नवीन चित्रपट , वेबसेरीज पाहणे हे आपल्या पैकी अनेकांना आवडत असेल म्हणूनच आज आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी ५ असे मल्याळम चित्रपट (malayalam movies) जे आपण एकदा तरी बघितले पाहिजे . हे सर्व चित्रपट विविध ott ॲपस्वर उपलब्ध आहेत .तर जाणून घेऊया कोणते आहेत ते ५ चित्रपट ज्यांनी धुमाकूळ घातला आहे.
malayalam movies
१) कुरूप : साऊथ सुपरस्टार दुल्कर सलमान ह्याचा कुरूप हा सिनेमा एक चरित्रात्मक सिनेमा आहे जो एस.के. कुरूप ह्या गुन्हेगारावर बनवण्यात आला आहे .चित्रपटाचे रहस्यमय कथानक आणि नैतिकतेचा शोध तुम्हाला खिळवून ठेवेल. कुठे पहायचा: हा चित्रपट नेटफलिक्स ह्या OTT ॲपवर उपलब्ध आहे.(malayalam movies)
२) सीबीआय ५ : मम्मूट्टी यांचा सीबीआय ५ हा चित्रपट सेथूरामा अय्यर नावाच्या एका सीबीआय ऑफिसर भोवती फिरतो . चित्रपटाचे धारदार लेखन , जबरदस्त कथानक आणि मामूट्टीचा उत्कृष्ट अभिनय हे सर्व ह्या चित्रपटाला must वॉच बनवतात .
कुठे पहायचा: हा चित्रपट अमेझॉन प्राईम ह्या ott ॲपवर उपलब्ध आहे.
३) कुंबलांगी नाईटस : किनारपट्टीच्या गावात राहणाऱ्या ४ भावांच्या गुंतागुंतीच्या आयुष्याची कथा ह्या चित्रपटामध्ये आहे. हे ४ भाऊ आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर कसा सामना करतात हे ह्या चित्रपटामध्ये मांडण्यात आले आहे .हा चित्रपट हृदयस्पर्शी आणि विचार करायला लावणारा आहे.
कुठे पहायचा: हा चित्रपट नेटफलिक्स ह्या ott ॲपवर उपलब्ध आहे.
४) अय्यप्पनम कोशियुम: पृथ्वीराज सुकुमारन आणि बिजू मेनन यांचा पॉवर पॅक परफॉर्मन्स असलेला हा चित्रपट सन्मान , बदला सारख्या अनेक थीम एक्सप्लोर करतो.
कुठे पहायचा: हा चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडिओ ह्या ott ॲपवर उपलब्ध आहे.
५) जोजी : फहद फासिलचा हा चित्रपट लोभ आणि फसवणुकीच्या जाळ्यात अडकलेल्या एका कुटुंबाची एक कथा सांगतो . हा चित्रपट थोडा स्लो आहे पण ह्याची कथा तुम्हाला नक्कीच थरारक अनुभव देईल
कुठे पहायचा: हा चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडिओ ह्या ott ॲपवर उपलब्ध आहे.
हे पण वाचा :
NEET 2024 | नीट 2024 बाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय !
आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा